राजुरीत मुक्तामाता देवीच्या मंदिराचा कलशारोहण

बेल्हे- राजुरी येथे ग्रामदैवत मुक्तामाता देवी मंदिराचा जीर्णोध्दर, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण निमित्ताने भाविकांतर्फे दिंडी काढण्यात आली. राजुरी (ता. जुन्नर) येथील श्री हनुमान देवस्थानच्या वतीने ग्रामदैवत असलेल्या मुक्तामाता देवीच्या मंदिराच्या जीर्णोध्दर आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण निमित्ताने आज आणि उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि. 13) भाविकांनी काढलेल्या दिंडी सोहळ्यात श्री संत मुक्तामातेच्या मूर्तीची भव्य सजावटीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. उद्या (दि. 134) मुक्तामाता मंदिर प्रवेश,वास्तुशांती पूजा, देवी नवंचड यज्ञ, स्वाहाकार पूर्णाहुती होणार आहे. दुपारी हभप सुदाम महाराज बनकर यांच्या हस्ते कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार असून, त्यानंतर कीर्तन कार्यक्रम होणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर औटी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)