राजीव सातव गुजरातचे प्रभारी

जितेंद्र सिंग ओडिशा, तर लालजी दैसाई कॉंग्रेस सेवादलाचे प्रभारी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या गुजरातमध्ये भाजपला “हात” दाखविण्याची जबाबदारी मराठी सरदाराच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना गुजरातचे प्रभारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या जागी तरुण पिढीच्या हाती “हात” द्यायला आजपासून सुरुवात केली. हिंगोलीहून कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांना गुजरातचे प्रभारी बनविण्यात आले आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना ओडिशाचे, तर लालजी देसाई यांना कॉंग्रेस सेवादलाचे प्रभारी बनविण्यात आले आहे.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्या ठिकाणी गुजरातचे प्रभारी बनविण्यात आले हे विशेष. गुजरातच्या निवडणुकीत सातव यांनी प्रभारी सचिव म्हणून काम पाहिले होते, हे येथे उल्लेखनीय.
कॉंगेसच्या 84 व्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील दरी कमी करण्याची हमी देत ज्येष्ठ नेत्यांना तयार राहण्याचा इशारा दिला होता. याची पहिली झलक आज बघायला मिळाली.

कॉंग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या पत्रानुसार, माजी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांना ओडिशाचे प्रभारी बनविण्यात आले आहे. आतापर्यंत ओडिशाचे प्रभारीपद बी. के. हरीप्रसाद यांच्याकडे होते. तर, अखिल भारतीय कॉंग्रेस सेवा दलाची जबाबदारी लालजी देसाई यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. मध्यप्रदेशचे महेंद्र जोशी यांच्याकडे सेवादलाचा कारभार होता.

अशोक गेहलोत यांना पक्ष संघटना आणि प्रशिक्षण विभागाचे प्रमुख बनविण्यात आले आहे. आतापर्यंत ही जबाबदारी जनार्दन द्विवेदी यांच्याकडे होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)