राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनीची सुटकेची मागणी फेटाळली

चेन्नाई – राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी नलिनी हिने आपली कारागृहातून सुटका करावी अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात सादर केली होती पण तिची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणात तिला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

राज्य सरकारच्या 1994 च्या योजनेनुसार आणि राज्य सरकारला शिक्षा माफ करण्याचा जो अधिकार आहे त्यानुसार त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार नलिनीने सुटकेची मागणी केली होती. तिचा या याच मागणीचा अर्ज ट्रायल कोर्टाने फटाळून लावल्यानंतर तिने मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती.

ज्या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला आहे त्या प्रकरणातील आरोपींची शिक्षा माफ करण्यापुर्वी संबंधीत राज्य सरकारने केंद्र सरकारची अनुमती घेणे आवश्‍यक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2016 रोजीच दिला आहे. नलिनीला कारागृहातून सोडण्यासाठी तामिळनाडु सरकारने केंद्र सरकारची अनुमती अद्याप घेतलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)