राजीव गांधी रुग्णालयातील प्रलंबित कामांना वेग

येरवडा – गर्भवती महिलेच्या बालकासह मृत्यूनंतर महापालिका प्रशासनाला आता जाग आली असून राजीव गांधी रुग्णालयातील विविध सोयीसुविधा विकास कामांना वेग आला आहे. मात्र, या देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपली नावे चमकवण्याचा प्रयत्न काही सोडलेला दिसत नाही. रुग्णालयाची सीमाभिंत, नवजात अर्भकांचा वॉर्ड तसेच पॅथोलॉजी लॅबचे काम प्रगतिपथावर सुरू आहे.

दि. 1 ऑक्‍टोबर 2003 मध्ये कॉंग्रेसची सत्ता असताना तत्कालीन आमदार दीपक पायगुडे यांच्या पाठपुराव्याने येथील पुणे महापालिकेच्या पेस्तनजी दवाखान्याची वास्तू राजीव गांधी रुग्णालयाच्यासाठी म्हणून भूमिपूजन करण्यात आले. माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या इमारतीचे कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेत दि. 3 मार्च 2007 मध्ये केवळ इमारतीचे उद्‌घाटन करण्यात आले.कोणताही सोयीसुविधा नसताना कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली केवळ वास्तू उद्‌घाटन करून सुरू करण्यात आली. केवळ गर्भवती महिलांची तपासणी व बाळंतपणासाठी या ठिकाणी उपचार सुरू होते.

अपुरे डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची संख्या यासोबतच अनेक समस्या राजीव गांधी रुग्णालय नेहमीच चर्चेत होते. मात्र, पुणे महापालिका आरोग्य विभागाने याची कोणतीच दखल घेतलेली दिसत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील रुग्णालयात नेमक्‍या कोणत्या सुविधा असाव्यात अथवा पूर्ण क्षमतेने रुग्णालय कसे सुरू होईल याकडे लक्ष दिले नाही. मागील दहा वर्षांत कॉंग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी कार्यरत होते. इमारतीचे सुशोभिकरण व भौतिक सुविधा याकडे त्यांनी लक्ष दिले.

मात्र, रुग्णांना आवश्‍यक कोणती सुविधा या ठिकाणी सुरू केल्या नाहीत.सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीने सत्ता गेल्यानंतर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरुवात यासाठी आंदोलन केले. कॉंग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू यासाठी माजी पर्यटनमंत्री चंद्रकांत छाजेड यांनी पाठपुरावा केला होता.लोकप्रतिनिधींची अनास्था तसेच महापालिका प्रशासनाचा गलथानपणा यामुळे रुग्णालय पूर्णक्षमतेने अद्यापही सुरू होऊ शकलेले नाही.

अपुरे डॉक्‍टर व कर्मचारी संख्या ही गंभीर बाब नेहमीच भेडसावत असून त्यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा देणे शक्‍य होत नाही.महापालिका प्रशासन यामध्ये कायम दिरंगाई करत असून राज्य शासनाकडून कोणते प्रकार नवीन डॉक्‍टर व कर्मचारी भरती यासाठीचा प्रस्ताव देण्यात आल्याचे आठवत नाही. मागील दोन वर्षांपासून काही विभाग नव्याने सुरू करण्यात आले होते. गरोदर माता, बालकांचे लसीकरण, श्वानदंशाची लस तसेच जनरल ओपीडी या ठिकाणी सुरू होती. मात्र, गर्भवती महिलांसाठी आवश्‍यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे तातडीचे वेळी रुग्ण महिलेला बाळंतपणासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात येते. तीन वर्षांपूर्वी येरवड्यातील एका गर्भवती महिलेचा अशाच प्रकारे योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता.

मात्र, या प्रकाराची प्रशासनाने दखल घेतल्यामुळे पुन्हा तोच प्रकार मागील आठवड्यात घडला. दुर्दैवाने रुग्णालयात डॉक्‍टर उपलब्ध असल्यामुळे शुभांगी जानकर या गर्भवती महिलेचा अर्भकासह मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्‍टरांचे निलंबन ही केवळ पळवाट असून रुग्णांना माफक चांगले व योग्य उपचार देण्याकडे प्रशासन डोळेझाक करत आहेत. गर्भवती महिलेच्या अर्भकाच्या मृत्यूनंतर सर्वांनी या घटनेकडे लक्ष वेधले. एमआयएम शिवसेना तसेच विविध पक्षांच्या नगरसेवकांनी जबाबदार डॉक्‍टरला निलंबित करण्याची मागणी केली.

उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेडे यांनी याप्रकरणी जबाबदार डॉ. विजय बडे यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. या गंभीर घटनेनंतर महापालिका आरोग्य विभागासह प्रशासनाला जाग झाली असून रखडलेल्या विविध कामांना रुग्णालयात वेग आला आहे. रुग्णालयातील एनआयसीयू, पॅथॉलॉजी लॅब, सीमाभिंत या कामांना वेग आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)