राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या सुटकेस केंद्राचा विरोध

सर्वोच्च न्यायालयात मांडली भूमिका
नवी दिल्ली – दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची कारागृहातून सुटका करण्याची मागणी तामिळनाडु सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे पण तामिळनाडु सरकारच्या या मागणीला केंद्र सरकारने विरोध केला आहे. ही प्रथा धोकादायक ठरेल आणि त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटू शकतील त्यामुळे या आरोपींना कारागृहातून सोडले जाऊ नये अशी भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालात मांडली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रतिज्ञापत्राद्वारे ही मागणी केली असून न्या. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्यांचे हे प्रतिज्ञापत्र सादर करून घेतले आहे.

-Ads-

राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची कारागृहातून सुटका करावी अशी विनंती करणारे पत्र तामिळनाडु सरकारने 2016 रोजी सादर केले आहे. त्या पत्रावर आपली भूमिका सादर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 23 जानेवारी रोजी दिला होता. त्यानुसार केंद्र सरकारने आपली ही भूमिका मांडली आहे.

राजीव गांधी हत्या प्रकरणातील सात आरोपी सध्या कारागृहात आहेत. त्यांना सोडण्याचा आदेश तामिळनाडु सरकारने जारी केला आहे. तथापी त्यांच्या या आदेशावर केंद्र सरकारचे मत मागवावे अशी सूचना न्यायालयाने केल्याने या आरोपींची अजून सुटका झालेली नाहीं. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ हे आरोपी कारागृहात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)