राजीनामा नाट्यातून पक्षावर दबाव  निर्माण करण्याचे काम सुरू

  • शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख कदम

लोणावळा – राजीनामा नाट्यातून पक्षावर दबाव निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मागील अनेक वर्षे याच पदाधिकाऱ्यांकडे पक्षाची सूत्रे होती. मात्र त्यांना त्यांच्या काळात विशेष काहीच करता आले नाही. त्यामुळे त्या काळात पक्ष संघटना कमकुवत झाली, असे प्रतिपादन शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील उर्फ बाळा कदम यांनी येथे केले. दोन आठवड्यांपूर्वी लोणावळा शहरातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. या प्रकरणावर पक्षाची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदेत बाळा कदम बोलत होते. कोणत्या ना कोणत्या कारणाने नाराज कार्यकर्त्यांचे मत पक्षाबाबत कलुषित करण्याचे काम काही जणांनी पडद्याआडून केले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी तालुकाध्यक्ष राजू खांडभोर यांच्या पदाला जी स्थगिती देण्यात आली त्यामागचे सूत्रधारही हेच लोक होते, असे संपर्क प्रमुख कदम यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला सेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख गणेश जाधव, तालुका प्रमुख राजू खांडभोर, पंचायत समितीच्या माजी सदस्या आशा देशमुख, लोणावळा शहर प्रमुख सुनील इंगुळकर, नगर परिषद विरोधी गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक माणिक मराठे, शिवदास पिल्ले, नितीन आगरवाल, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश केदारी, युवा सेनेचे तानाजी सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुका प्रमुख तसेच शहर प्रमुख यांच्या निवडी परस्पर केल्या नसून त्यासाठी संपूर्ण निवड प्रक्रिया राबवली असल्याचे सांगून सर्व नाराजांची पक्षाप्रती असणारी निष्ठा लक्षात घेऊन त्या सर्वांना पुन्हा पक्षकार्यात सामावून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच सेनेच्या “मिशन 150′ ची माहिती देत घरा-घरांपर्यंत धनुष्य-बाण पोचवण्यासाठी सेनेचे कार्यकर्ते सज्ज असल्याचे कदम यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)