राजीनामा दिलेल्या न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप

हैदराबाद: हैदराबादमधील मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणात स्वामी असीमानंद यांची निर्दोष मुक्तता करणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी, निकाल दिल्यानंतर काही तासातच न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या या झटपट राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. दरम्यान, त्यांच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होताना दिसत आहेत.

न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी राजीनाम्यासाठी वैयक्तिक कारण दिले. रेड्डी हे दोन महिन्यांनी निवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच, तेही असीमानंद यांच्या निकालानंतर त्यांनी राजीनामा दिल्याने, उलटसुलट चर्चा सुरु झाली. मात्र न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांची  न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली हायकोर्टाच्या दक्षता विभागाकडून चौकशी सुरु आहे. न्यायाधीश रेड्डी यांच्याविरोधात कृष्णा रेड्डी नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. कृष्णा यांनी न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, त्यांच्यावर 12 डिसेंबर 2017 रोजी हायकोर्टात तक्रार दाखल केली.

न्यायाधीश रेड्डी यांनी टी पी रेड्डी नावाच्या आरोपीला पैसे घेऊन जामीन दिल्याचा आरोप, कृष्णा रेड्डी यांनी केला आहे. टी पी रेड्डीवर 300 कोटीच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी सत्र न्यायालायने तीन वेळा त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. हायकोर्टानेही गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. अशावेळी टी पी रेड्डीने जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र टी पी रेड्डीने पुन्हा त्याच कोर्टात जामीनासाठी अर्ज केला, ज्या कोर्टाने तीन वेळा जामीन अर्ज फेटाळला होता. 

टी पी रेड्डीने सत्र न्यायालयात पुन्हा जामीनासाठी अर्ज केला. मात्र त्यावेळी पूर्णवेळ न्यायाधीश दोन दिवसांच्या सुट्टीवर होते. तेव्हा कोर्टाचा कार्यभार दोन दिवसांसाठी न्यायाधीश रवींद्र रेड्डींकडे होता. त्यावेळी न्यायाधीश रेड्डींनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्णत: न ऐकता, दोनच दिवसाच्या सुनावणीत टी पी रेड्डीला जामीन दिल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. या प्रकारानंतर तक्रारदार कृष्णा रेड्डी यांनी न्यायाधीश रेड्डींवर भ्रष्टाचाराचा आरोप करत, हायकोर्टात तक्रार केली. त्यावेळी हायकोर्टाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं. या तक्रारीनंतरच हायकोर्टाचा दक्षता विभाग चौकशी करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)