राजा शिवछत्रपती परिवाराकडून किल्ले भूषणगडची स्वच्छता

किल्ले भूषणगड ः किल्ले भूषणगडची स्वच्छता मोहीम पार पाडताना सांगली व सातारा विभागाच्या मावळे.

म्हासुर्णे, दि. 12 (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील दुर्गस्वच्छतेत अग्रेसर असनारी नोंदणीकृत नामांकित संस्था “राजाशिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र” यांचेमार्फत सातारा जिल्ह्यातील किल्ले भूषणगड दुर्गस्वच्छता व जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या परिवारामार्फत अखंड महाराष्ट्रातील जिल्ह्यातून दुर्गस्वच्छता व जनजागृतीचे शिवकार्य केले जाते. सांगली व सातारा विभागाच्या कार्यकर्त्यांनी मिळून संयुक्तरित्या ही मोहीम पार पाडली. यावेळी गडावरील काटेरी झाडेझुडपे काढण्यात आली. तसेच गडावरील पाऊलवाट मोकळी करून गडावरील आणी हरणाई मंदीर परिसरातील प्लॅस्टिक व इतर घनकचरा गोळा करून गडाच्या पायथ्याशी एकत्र करण्यात आला. मोहिमेदरम्यान दुर्गसंवर्धनाबाबत प्रबोधन करण्यात आले. म्हासुर्णे ग्रामपंचायतीच्यावतीने उपसरपंच सुहास माने,माजी उपसरपंच अजित माने, शरद माने, लक्ष्मण माने, श्रीधर माने यांनी शिवप्रतिमा देवून परिवारातील मावळ्यांचा सत्कार केला. या स्वच्छता मोहिमेस विकास सरनोबत व प्राध्यापक ज्ञानेश्वर माने(माऊली) यांचे विशेष सहकार्य लाभले.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)