राजाचे कुर्लेत एक दिवा शहीद जवान व बळीराजासाठी

फ्रेंडस ग्रुप सोशल फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

पुसेसावळी, दि. 10 (प्रतिनिधी) – कार्तिक मासातील पहाटवारा वातावरणात अलगदपणे थंडीची पेरणी करतो. या दिवसात वातावरणात एक चैतन्य भरून राहिलेलं असतं. ना चैत्रातील रणरणता असते ना आषाढातील रिपरिपता. या दिवसात आपण दिवाळीचा सण साजरा करत असतो. परंतु, यंदाच्या या दीपोत्सवाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि अशांत काश्‍मिरात शहीद होणारे जवान यांची काळीकुटट्‌ काजळी चढलेली आहे. म्हणूनच राजाचे कुर्लेमध्ये एक दिवा शहीद जवान व बळीराजासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यासह, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि काही अंशी पश्‍चिम महाराष्ट्रावर दुष्काळाच सावट गडद आहे.
या शहिद होणाऱ्या सैनिक आणि बळीराजालासुद्धां यांप्रती सांत्वनपर भावना व्यक्त करणं आणि त्यांना आपल्यापरी मदत करुन कृतीची जोडं देणं हे आपल्यातील माणूसपण जिंवत असल्याच उदाहरण आहे. म्हणूनच खटाव तालुक्‍यातील राजाचे कुर्लेत एक दिवा शहीद सैनिक व बळीराजासाठी कार्यक्रम झाला. शहीद सैनिक व शेतकर्याप्रतीची आदराच्या भावना ग्रामस्थांनी दिवे प्रज्वलित करुन व्यक्त केल्या. राजाचे कुर्ले ग्रामस्थ आणि फ्रेंडस ग्रुप सोशल फाऊंडेशन दरवर्षी बलिप्रतिपदा पाडव्याला एक दिवा शहीदांसाठी हा श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित करून बळीराजा आणि सैनिक यांच्याप्रती भावना व्यक्त करतात. या कार्यक्रमास गावातील सर्व आजी माजी सैनिक संग्रामसिंह माने, दयानंद माने, मदन यादव, अभयसिंह यादव, संतोष पवार, महेश माने, किरण माने, कृष्णत थोरवे व मान्यवर व ग्रामस्थ, युवकांची उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)