“राजहंस’कडून दुधाला प्रतिलिटर 25 रुपये

संगमनेर – संगमनेर येथील राजहंस दूध संघाच्या वतीने गाईच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.
ते म्हणाले, की पॅकींग व्यतिरिक्त भुकटी किंवा उपपदार्थासाठी स्वीकारण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये प्रमाणे दर देण्याची तयारी दूध संघांनी दाखविली. मंगळवारी राज्य शासन आणि दूध संघांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. तीत सहकारी आणि खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्याच्या प्रस्तावाला संमती दिली. अनुदानासाठी दुधाच्या गुणवत्तेची अट 3.2 फॅट आणि 8.3 एसएनएफ अशी शिथिल करण्यासही शासनाने या वेळी मान्यता दिली. मात्र जे दूध संघ 25 रुपये दर देणार नाहीत, अशा संघांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाने दिला आहे. या संदर्भातील शासन आदेश तातडीने जारी करण्यात आला असून त्याची प्रतही आज संगमनेर दूध संघाला प्राप्त झाली आहे.
दुग्धोत्पादक शेतकऱ्याला शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रतिलिटर 25 रुपये दर देताना, पाच रुपये अनुदान देण्यासाठी पॅकिंगच्या दुधाचे दर वाढवणे क्रमप्राप्त असल्याने, संघाच्या सोईप्रमाणे ही दरवाढ होऊ शकते. शासनाच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी सहकारी दूध संघ करतील; मात्र काही खासगी दूध संकलक व दूध संघांनी अंमलबजावणी न केल्यास यात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. राज्य शासनाने अनुदान वितरणासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार केले असल्याची माहिती या बैठकीत संघांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. त्यानुसार संघांना दररोज खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाबाबतची ऑनलाईन माहिती भरावी लागणार आहे. त्याप्रमाणे दूध संघांना शासनाकडून अनुदान वितरीत केले जाणार आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)