राजस्थान सरकारचा अजब फतवा…

संग्रहित छायाचित्र....

कामगार मंत्रालयात जीन व टी शर्ट घालण्यास बंदी
जयपुर – कोणत्याही कर्मचाऱ्याने कार्यालयात येताना जीन्स किंवा टीशर्ट घालून येऊ नये असा फतवा राजस्थान सरकारच्या कामगार मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काढला आहे. त्याला कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 21 जून रोजी कामगार आयुक्त गिरीराज कुशवाह यांनी या आदेशाचे परिपत्रक जारी केले.

जीन्स आणि टी शर्ट परिधान करणे हे अशोभनीय आहे. त्यातून सरकारी कार्यालयांची प्रतिमा मलिन होते. या कार्यालयाचा सन्मान कायम ठेवण्यासाठी यापुढे जीन्स आणि टीशर्ट घालण्यास मनाई करण्यात येत आहे असे, यात नमूद करण्यात आले आहे. कामगार आयुक्तांनी या परिपत्रकाचे समर्थन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेकोरम पाळण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे असे त्यांनी म्हटले आहे. यापुर्वीही विविध ठिकाणी आम्ही असे आदेश जारी केले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. जीन्स आणि टी शर्ट हा अशोभनीय वेष कसा असा सवाल कर्मचारी संघटनांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)