राजस्थान रॉयल्स संघात “हा’ खेळाडू घेणार स्टीव्ह स्मिथची जागा

नवी दिल्ली – बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरुनही स्मिथला पायउतार व्हावे लागले होते. आयपीएलचा अकरावा हंगाम अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेला असताना, राजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मिथऐवजी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्‍रिच क्‍लासेनला संघात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

क्‍लासेनसोबत करार करण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयकडे परवानगी मागितली असल्याचे समजते. राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख झुबिन भरुचा यांनी यासंदर्भात माहिती दिली. याचसोबत स्मिथच्या जागेसाठी जो रूट आणि हाशिम आमला यांचाही विचार झाल्याचं भरुचा यांनी सांगितलं. मात्र भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात क्‍लासेनने केलेली कामगिरी आणि भविष्यकाळात स्मिथला पर्याय म्हणून क्‍लासेन चांगली कामगिरी करू शकेल असा विश्वास संघ-व्यवस्थापनाने व्यक्‍त केला आहे.

फिरकी गोलंदाजांना आत्मविश्वासाने सामना करेल अशा फलंदाजाची आम्हाला गरज होती. भारतीय संघाच्या आफ्रिका दौऱ्यात क्‍लासेनने वन-डे व टी-20 सामन्यात भारताच्या फिरकीपटूंचा आत्मविश्‍वासाने सामना केला होता. भारतीय फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर स्वीप, रिव्हर्स स्वीप यासारखे फटके क्‍लासेन अगदी सहज खेळू शकतो. त्यामुळे पुढील तीन वर्षांचा विचार करुन क्‍लासेनला संघात आणण्याचा आमचा मानस असल्याचे भरुचा यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)