राजस्थानात 11 पाकिस्तानी नागरीकांना अटक 

बिकानेर: राजस्थानच्या अनुपगड गावात गेल्या दोन दिवसांत 11 पाकिस्तानी नागरीकांना अटक करण्यात आली आहे. हे गाव राजस्तानच्या पाकिस्तान सीमेलगत असलेल्या श्रीगंगानगर जिल्ह्यात येते. पाच नागरीकांना काल रात्री अनुपगड रेल्वेस्टेशनवर ताब्यात घेण्यात आले तर अन्य सहा जणांना अन्य विविध ठिकाणी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील पाच जणांकडे हरिद्वारला जाण्याचा अधिकृत व्हीसा आहे. हे बहुधा पाकिस्तानातील हिंदु नागरीक आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. यातील काही नागरीक राजस्तानातील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते असे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)