राजस्थानात रनवे सोडून विमानाने ठोकली सीमाभिंत – सुदैवाने प्रवासी बचावले

जयपूर (राजस्थान) – रनवे सोडून विमानाने विमानतळाची सीमाभिंत ठोकण्याची घटना राजस्थानात घडली. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. राजस्थानच्या श्री गंगानगरच्या लालगड विमानतळावर मंगळवारी ही दुर्घटना घडली.

सुप्रीम एयरलाईन्सची हे फ्लाईट जयपूरहून आली होती. 7 प्रवासी आण्‌ दिोन वैमानिक असलेले हे विमान विमानतळावर उतरत असताना धावपट्टी सोडून पढे गेले आणि विमानतळाच्या सीमाभिंतीवर आदळले. सुदैवाने प्रवासी वा वैमानिक-कोणाही जखमी झाले नाही, असे सुप्रीम एयरलाईन्सचे सीईओ अमीत के अग्रवाल यांनी सांगितले.

-Ads-

आग किंवा नुकसानीची अन्य कोणतीही बातमी बनावट असेल. त्यावर विश्‍वास ठेवू नये आणि घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे सीईओ अग्रवाल यांनी सांगितले आहे.

लालगड विमानतळाची धावपट्टी लहान-3,000 मीटर्सची आहे. धावपट्टीवर उतरलेले विमान धावपट्टी सोडून पुढे गेले आणि भिंतीवर आदळले. डीजीसीए (डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल ऍव्हिएशन) यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)