राजस्थानात भाजपला झटका

पक्षाचे नेते मानवेंद्रसिंह बंडाच्या पावित्र्यात
जयपुर – भारतीय जनता पक्षाला राजस्थानात मोठा झटका बसला आहे. या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह हे बंडाच्या पावित्र्यात असल्याचे वृत्त आहे. त्यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या प्रचार यात्रेवर बहिष्कार घातला आहे त्यांच्या या यात्रेतील अनुपस्थितीमुळे ते पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण लागली. आता त्यांनी येत्या 22 सप्टेंबरला आपल्या समर्थकांचा एक स्वतंत्र मेळावा आयोजित केला आहे त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

त्यांचे वडिल जसवंत सिंह यांनीही भाजपच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला होता. सन 2014 च्या निवडणुकीत त्यांना भाजप मधून निलंबीत करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी बारमेर मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे पसंत केले होते. त्यांचेच अनुकरण त्यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांनी करण्याचे ठरवले आहे असे सांगण्यात येते. 22 सप्टेंबरला त्यांनी आपल्या मतदार संघात आयोजित केलेल्या मेळाव्याचे पोस्टर प्रकाशित केले असून त्यात त्यांनी आपल्या वडिलांचा मोठा फोटो छापला आहे.

स्वाभीमान रॅली नावाने त्यांनी हा मेळावा आयोंजित केला आहे हा सरळसरळ बंडाचा पवित्रा असल्याचे मानले जाते. ऐन निवडणूक काळात भाजपला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. तथापी त्यांनी आपली कॉंग्रेस मध्ये जाण्याची इच्छा नाही असे स्पष्ट केले आहे. त्यापेक्षा अपक्ष म्हणूनच पुढील विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा इराद आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)