राजस्थानातील संशोधकाच्या उत्पादनात नासाला स्वारस्य

जयपुर – राजस्थानातील एका संशोधकाने अंतरीक्ष यानाच्या इंजिनातील गॅस टर्बाईनसाठी थर्मल स्प्रे कोटिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे या तंत्रज्ञानात अमेरिकेतील नासा या अंतरीक्ष संशोधन संस्थेने स्वारस्य दाखवले आहे. नासाचे वैज्ञानिक जेम्स एल स्मियालेक यांनी एक पत्र लिहुन नासाला या तंत्रज्ञानात स्वारस्य आहे असे कळवले आहे. त्यांनी विकसित केलेले हे तंत्रज्ञान जर्नल सीरॅमिक इंटरनॅशनल ऍन्ड थर्मल स्प्रे बुलेटिन मध्ये प्रकाशित झाले आहे. ती माहिती वाचल्यानंतर नासाच्या तंत्रज्ञांनी त्यात आम्हालाही स्वारस्य आहे असे कळवले आहे. डॉ. सतीश तैलोर असे या भारतीय संशोधकांचे नाव आहे. ते जोधपुर येथील मेटलायझिंग इक्विपमेंट कंपनीत मुख्य संशोधक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी अंतरीक्ष यानाची गरज लक्षात घेऊन वायएसझेड प्लाझमा स्प्रेड कोटिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांनी सांगितले की अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर या कोटिंगला पडणारे उभे तडे हे गॅस टर्बाईन इंजिनासाठी उपयुक्तच ठरतात. हे तडे पाडण्यासाठीचे सध्याचे तंत्रज्ञान खूपच खर्चीक आहे. हे तडे पाडण्याचे काम कोटिंग डिपोझिशन प्रोसेसच्यावेळीच केले जाते. या तंत्रज्ञानात नासाने स्वारस्य दाखवले असून त्यांनी ही माहिती आपल्याला इमेल द्वारे कळवली. भारतातील सीएसआयआर आणि डीआरडीओ या संस्थांनीही त्यात स्वारस्य दाखवले आहे असे त्यांनी आज पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. सीएसआयआरचे ज्येष्ठ वैज्ञनिक डॉ. आरएम मोहंती यांनी सांगितले की हे संशोधन खूपच उपयुक्त आणि प्रभावी आहे. हे तंत्रज्ञान शोधून काढणारे डॉ तैलोर यांनी मेटलर्जिकल इंजिनिअरिंग या विषयात जयपुरच्या मालविय नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी या संस्थेतून पीएचडी केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)