राजस्थानमध्ये रस्त्यावर आढळले बॅलेट युनिट; ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह

प्रातिनिधिक छायाचित्र

दोन अधिकारी निलंबीत 

जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणूकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून किशनगंज विधानसभा मतदारसंघ क्षेत्राच्या शाहबाद परिसरात एक बॅलट युनिट रस्त्यावर सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, बॅलेट युनिट हाताळण्यात निष्काळजीपणा दाखवल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

छत्तीसगडमध्ये तिघांना अटक
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर जिह्यात स्ट्रॉंग रुम परिसरात लॅपटॉप घेऊन प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना अटक केली. तर याप्रकरणी दोन सुरक्षा कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. बस्तर जिह्यातील पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालय जगदलपूरमधील धरमपुरा परिसरातील महिला पॉलिटेक्‍नकि कॉलेजमध्ये बनवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात लॅपटॉप घेऊन प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी उमापती तिवारी, विजय मरकामसहीत आणखी एका युवकाला अटक केली आहे.

या प्रकरणी अब्दुल रफीक आणि नवल सिंह पटवारी या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. मतदान यंत्रांच्या विश्वासहर्तेबद्दल विविध राजकीय पक्षांच्या मनात संशय असताना हा प्रकार समोर आला आहे. सापडलेल्या मतदान यंत्राचा मतदानासाठी वापर झाला होता का? कि, ते राखीव होते ते अजून स्पष्ट झालेले नाही. राखीव असलेले मतदान यंत्र ट्रकमधून रस्त्यावर पडले असावे, असा अंदाज जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी व्यक्त केला. सध्या हे बॅलेट युनिट किशनगंजच्या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये शुक्रवारी विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी मतदान झाले. 72.7 टक्के मतदान झाले असून एकूण 2,274 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी 52 हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मतदानासाठी 2 लाख मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर करण्यात आला. येत्या 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)