राजस्थानपाठोपाठ आंध्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त

अमरावती: विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम होऊन राजस्थानपाठोपाठ आंध्रप्रदेशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्यासाठी पाऊले उचलण्यात आली. मात्र, इतर राज्यांनी आणि केंद्र सरकारने इंधनांवरील करांमध्ये तूर्त कपात करण्याचे कुठलेही संकेत दिले नाहीत.

बंदच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी इंधनांवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) 4 टक्‍क्‍यांनी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे त्या राज्यात पेट्रोल आणि डिझेल अडीच रूपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर सोमवारी आंध्रचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी इंधनांवरील कर कमी करण्याचा निर्णय विधानसभेत जाहीर केला. त्यामुळे त्या राज्यात इंधन 2 रूपयांनी स्वस्त होणार आहे. इंधन स्वस्त करण्याशी संबंधित निर्णय जाहीर केल्यानंतर चंद्राबाबूंनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

मोदी सरकारने सुमारे साडेचार वर्षांत इंधनांवरील कर आणि लाभांशापोटी तब्बल 23 लाख कोटी रूपयांचा महसूल मिळवला. मात्र, इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या जनेतला दिलासा देण्यासाठी कुठली पाऊले उचलण्यात त्या सरकारला अपयश आले, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)