राजस्थानच्या 33 मतदारसंघांत भाजपा-कॉंग्रेसचे तेच उमेदवार आमने सामने 

जयपूर (राजस्थान) – राजस्थान विधानसभेच्या 200 पैकी 33 मतदार संघांमध्ये भाजपा आणि कॉंग्रेसचे तेच उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. यामध्ये कॉंग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचाही समावेश आहे.

मागील निवडणुकीतील किती जण विजयी परंपरा मतदार कायम ठेवतात आणि किती जणांचे नशीब पालटतात ते पाहण्यासाठी फार काळ थांबण्याची आवश्‍यकता नाही. गेल्या निवडणुकीत भाजपाने विक्रमी 163 जागांवर विजयाचे शिक्कामोर्तब केले होते. तर कॉंग्रेसचे केवळ 21उमेदवार विजयी झाले होते.

या वेळी 124 उमेदवारांचे मतदार संघ बदलण्यात आले आहेत, तर 43 जणांना प्रथमच निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आलेली आहे. कॉंग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार गेहलोत जोधपूरमधील सरदारपुरा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सलग चार वेळा विधानसभा आणि त्यापूर्वी पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. मात्र गेल्या वेळी प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या खेतासार यांनी त्यांना जोरदार लढत देत त्यांचे मताधिक्‍य केवळ 18 हजारपर्यंत खाली आणले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)