राजश्रय असला तरी डॉल्बी नकोच

उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला बळ
सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) –
डॉल्बी सिस्टीमबाबत आजपर्यंत अनेकवेळा प्रबोधन होऊनसुद्धा पोलिसांना आव्हान देत मंडळांकडून त्याचा वापर केला जातो. साताऱ्यात तर या आव्हानाला थेट खासदार उदयनराजे भोसले यांचा राजाश्रय मिळाला आहे. त्यामुळे साताऱ्यात प्रशासन विरूध्द उदयनराजे असा संघर्ष निर्माण झाला आहे. डॉल्बीच्या राजकीय संघर्ष बाजूला ठेवला तरी डॉल्बीचा दणदणाट वैद्यकीय दृष्टया शरीराला हानिकारकच आहे. डॉल्बीचे कायदे काय आहेत, व त्या कायद्यांच्या अंमलबजावणीचे कसे काम होते हा वादाचा विषय आहे. या तांत्रिक तपशीलात एक हलकीशी लक्ष्मण रेषा आहे. गतवर्षीचा अनुभव पाहता साताऱ्यात काही मंडळांवर ध्वनिप्रदूषण केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही प्रक्रिया आता न्यायालयीन स्तरावर आहे. आणि उच्च न्यायालयाने नो डॉल्बी म्हणल्याने डॉल्बीचा दणदणाट गणेशोत्सवात आता कायदेशीरदृष्टया बंद राहणार आहे . ध्वनिप्रदूषणामुळे नेमके काय होते, त्याचे परिणाम काय आहेत, सर्वसामान्यांना त्याचा त्रास काय होऊ शकतो, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

शास्त्रीय विश्‍लेषण केले असता शरीरावर परिणाम करणाऱ्या अनिष्ट बाबी समोर येतात. गणेश आगमनावेळी साताऱ्यात राजपथावर मुख्य मार्गावर साधारण तीन वर्षापूर्वी डॉल्बीच्या आवाजाने भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. अधिक मंडळांकडून डॉल्बी सिस्टीमचा वापर होत असल्याचे दिसून आले. 2015 च्या आकडेवारीनुसार केवळ साताऱ्यातीलसुमारे 16 मंडळांतील हून अधिक कार्यकर्त्यांवर डॉल्बी सिस्टीम वाजविल्याबद्दल कारवाई करण्यात आली. आज त्या कार्यकर्त्यांना नोकरी मिळविताना आणि पासपोर्ट मिळविताना अनेक कायद्याच्या बाबीतून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे उत्सवातील आनंद द्विगुणित झाला पाहिजे; पण इतरांना त्रास होऊ नये, याचीही दक्षता घेतली पाहिजे.

कानाचे तीन भाग असतात – बाह्य, मध्य आणि अंतर्कर्ण बाह्य आणि मध्य यांच्यामध्ये कानाचा पडदा असतो. ध्वनिलहरी बाह्य कर्ण कानाच्या पडद्यामार्गे मध्यकर्णात येतात. मध्यकर्णात लहान तीन हाडांच्या साखळ्या असतात. त्यामार्गे हा आवाज अंतर्कर्णात येतो. अंतर्कर्णात हेअर सेल असतात, त्यांच्यामार्फत ऑडिटरी नर्व्हच्या माध्यमातून लहरी मेंदूकडे जातात. जेव्हा अगदी मोठा आवाज होतो, तेव्हा त्या अंतर्कर्णातील हेअरसेलमध्ये दोष निर्माण होऊन या ध्वनिलहरी मेंदूकडे पाठविल्या जात नाहीत. आवाजाबाबत विशेष म्हणजे 30 डेसिबल म्हणजे तोंटात पुटपुटणे, 60 म्हणजे नेहमीचे बोलणे, 90 म्हणजे ओरडणे, 120 म्हणजे कानासाठी अस्वस्थ आवाज, 130 म्हणजे कानात वेदनादायक आवाज होय. डॉल्बी आणि फटाक्‍यांच्या आवाजाने कानाला हानी पोहोचू शकते.
डॉ. आनंद पटवर्धन

असा होऊ शकतो परिणाम
डॉल्बीचा आणि फटाक्‍यांच्या आवजाने श्रवणशक्तीला हानी पोहोचते, कानाचा पडदा फाटला जाऊ शकतो. पडद्याला छिद्र पडू शकते. मध्यकर्णाच्या हाडांच्या साखळीला इजा पोहोचू शकते. काही वेळा कानात आवाज (रिंगिंग साऊंड) येऊ शकतो.

डेसिबल किती वेळ आवाज क्षमता तास
साधारणपणे 90 डेसिबलचा आवाज आपण आठ तास ऐकू शकतो; मात्र 115 डेसिबल आवाज केवळ 25 मिनिटेच ऐकू शकतो.

डेसिबल वेळ
90 डेसिबल – 8 तास
95 डेसिबल – 4 तास
100 डेसिबल -2 तास
105 डेसिबल -1 तास
110 डेसिबल -30 मिनिटे
115 डेसिबल -25 मिनिटे

सर्वसाधारण — नेहमीचे आवाज मापन (डेसिबल)
रेफ्रिजरेटर – 45
नेहमीचे बोलणे – 60
हेवी ट्रॅफिक – 85
मोटारसायकल – 95
एमपी थ्री प्लेअर मोठा आवाज – 105
सायरन – 120
फटाके – 150

बाह्य आवाजापासून कानाच्या संरक्षणाचे काही उपाय
कापूस बोळे – 5 डेसिबलपर्यंत संरक्षण
इअर प्लग – 15–30 डेसिबलपर्यंत
इअर मफ – 30-40 डेसिबल
इअर प्लग आणि मफ – 40 पेक्षा जादा डेसिबलसाठी

विभाग – दिवसा ः रात्री दहा ते सकाळी
सहा औद्योगिक वसाहती – (75 डेसिबल) ः (70 डेसिबल)
कमर्शिअल – 65 ः 55
रेसिडेन्शिअल – 55 ः 45
सायलेंट झोन – 50 ः 40 –

ठळक
गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांची संख्या
2016 मध्ये 380 मंडळे
2017 मध्ये 392 मंडळे
2018 मध्ये साधारण 418


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)