राजर्षी शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत कृषी अभ्यासक्रमाचाही समावेश

मुंबई : राज्य सरकारने राजर्षी शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेत असतानाच या योजनेत आता कृषी अभ्यासाचाही समावेश करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय या योजनेचा लाभ आता ओबीसींप्रमाणेच ईबीसी विद्यार्थ्यांना होणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे.
बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या ईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यापूर्वी ईबीसी सवलतीसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख इतकी होती. ईबीसी वर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिक्षण शुल्कापोटी 50 टक्के रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शिक्षण (MBBS & BDS) घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीयकृत अथवा शेल्युल्ड बॅंकेतून घेतलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज शासन भरणार, असा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)