राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन

चिंचवड – भारिप बहुजन महासंघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची 142 वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाहूनगर येथील शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी कार्याध्यक्ष भारत कुंभारे, सुधाकर साबळे, सरला उपरवट, मनिषा साळवे, सलोखा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राहूल ओव्हाळ, सचिव हरिष डोळस, अनवर सय्यद, भैया ठोकळे, कांता सोनवणे, छाया चांदणे, स्मिता मराठे, भारिपचे राजेश भारसागडे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शहराध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष वैशाली काळभोर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सुर्यकांत पात्रे, सचिन सकारे, शिवाजी सुरवसे, शरद गायकवाड, अभिजीत भालेराव, सुरज देवकिरे, शिवदास चिलवंत, योगेश आयवळे, अभिजीत गोपी, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)