राजर्षि शाहू बॅंकेच्या सभासदांना 12% लाभांश

बॅंकेचा एकूण व्यवसाय 1207 कोटी रुपयांच्या वर पोहोचला 

पुणे: पुणे येथील राजर्षि शाहू सहकारी बॅंकेची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्र. दि. ऊर्फ आबासाहेब शिंदे यांचे अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 4 ऑगस्ट 2018 रोजी एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशन नानासाहेब गोरे अकादमी यांचे एस.एम.जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे संपन्न झाली. सदर सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. याप्रसंगी बॅकेचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांनी सांगितले कि, दि.31/03/2018 अखेरच्या बॅकेच्या एकूण ठेवी रु.711 कोटींच्या असून,रु.496 कोटींचे कर्ज वाटप बॅकेने केले आहे. बॅंकेचा एकूण व्यवसाय रु.1,207 कोटींचा झाला आहे.

-Ads-

बॅंकेचे ग्रॉस एनपीएचे प्रमाण 3.02% असून नेट एनपीएचे प्रमाण 0% आहे. तसेच बॅंकेचे स्टॅंडर्ड कर्जाचे प्रमाण 96.98% आहे. 31 मार्च 2018 अखेर बॅंकेस ग्रॉस नफा रु.20 कोटी 90 लाख झाला असून त्यामधून आयकर व इतर केलेल्या आवश्‍यक तरतूदी रु.15 कोटी 81 लाख वजा जाता बॅंकेला निव्वळ नफा रु.5 कोटी 9 लाख झालेला आहे असे त्यांनी यावेळी सभासदांना सांगितले.

ते म्हणाले की, आर्थिक वर्ष 2017-2018 साठी सभासदांना 12% लाभांश सभेत जाहीर केला. तसेच कर्ज परतफेड नियमितकरणाऱ्या कर्जदारांना व्याजदरात 1 % ते 2 % पर्यंत रिबेट बॅंक देत आहे. बॅकेला स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. बॅंकेने बाजीराव रोडलगत, टेलिफोन भवन जवळ मुख्य कचेरी प्रशासकीय कामकाजासाठी जागेसह संपूर्ण इमारत खरेदी केली आहे त्या झालेल्या खरेदी व्यवहारास सभासदांनी आनंद व्यक्‍त करून मान्यता दिली.

विशेष आनंदाची बाब म्हणजे दि महाराष्ट्‌ अर्बन को-ऑप.बॅंक्‍स फेडरेशन, मुंबई यांनी आयोजित केलेल्या राज्यातील सर्वोत्कृष्ट बॅंक स्पर्धेत आपल्या बॅंकेला सन 2016-2017 चा सर्वोत्कृष्ट बॅंक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून गेली सलग 7 वर्षे बॅंक सदर पुरस्काराने सन्मानित झाली आहे असे नमूद केले. याबद्दल उपस्थित सभासदांनी संचालक मंडळ व सेवक वर्गाचे खास अभिनंदन केले.

बॅंकेच्या प्रगतीचा वाढता आलेख व मिळालेल्या यशामध्ये प्रामुख्याने सभासद, खातेदार यांनी बॅंकेवर दाखविलेला विश्‍वास, संचालक मंडळाचा एकोप्याचा आणि पारदर्शक कारभार आणि सातत्यपूर्ण विनम्र सेवा देणारे सेवक वर्ग या सर्वाचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगितले. सभेत इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेत 80 % पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या सभासदांच्या मुला- मुलींचा गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

आलेल्या सर्व मान्यवरांचे व सभासदांचे स्वागत बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश लक्ष्मण पासलकर यांनी केले. आभार प्रदर्शन बॅंकेचे उपाध्यक्ष सुधाकर पन्हाळे साहेब यांनी केले. सभेचे सूत्र संचलन श्री.रमेश रामभाऊ सुतार यांनी केले. सभा मोठया उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणात व आनंदात पार पडली असे बॅंकेने म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)