राजरोसपणे हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसाय सुरू ?

पुणे – शहरात मागील काही वर्षांत हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसायासाठी बेकायदा परदेशी मुलींना शहरात आणले जात आहे. टुरिस्ट किंवा बिझनेस व्हिसावर त्यांना आणून त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करून घेतला जात आहे. यासाठी स्पा, मसाजसेंटर किंवा हॉटेल मालक दलालांमार्फत परदेशी मुली मागवतात. या मुलींना व्हिसा मंजूर करून देण्यापासून ते ग्राहक मिळवून देण्यापर्यंत सर्व काम दलाल करतात.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईत मात्र नेमके हे दलालच सुटतात. अनेकदा कारवाईमध्ये दलालांची पूर्ण नावेही निष्पन्न होत नाहीत; तर दुसरीकडे शहरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये राजरोसपणे हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसाय सुरू असताना हॉटेल मालक मात्र कारवाईतून सुटलेले दिसतात.

हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसायात उझबेकिस्तान, रशिया, बॅंकॉक (थायलंड) आदी देशांतील परदेशी तरुणींची संख्या मोठी आहे. या हायप्रोफाईल वेश्‍याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई होत असते. यामध्ये मुलींची सुटका करून त्यांना न्यायालयामार्फत सुधारगृहात पाठवले जाते. यानंतर परदेशी नोंदणी विभागामार्फत त्यांना संबंधीत देशांत डिपोर्ट केले जाते. परदेशी नोंदणी विभागाने आता अशा गुन्ह्यात सापडलेल्या मुलींना ब्लॅक लिस्ट करण्यास सुरुवात केली आहे. जेणे करून त्या पुढील काही वर्षे पुन्हा देशात व्यवसायासाठी येऊ शकत नाहीत.

मात्र, या व्यवसायातील दलालांकडून कारवाई झाल्यास पुन्हा नव्या परदेशी तरुणींना शहरात आणले जाते. या दलालांना बेड्या ठोकण्यास गुन्हे शाखा कमी पडते. यामुळे शहरातील हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसाय कारवाई होऊनही फोफावलेला दिसतो. पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पातळीवरच सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाई बद्दल समाधान नसल्याचे सुत्रांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले जे पुण्यात घडत ते सार्या देशात घडत असं ऐकिवात आहे हे खरे असेल तर ह्या व्यवसायाचे राष्ट्रीयकरण करणे यॊग्य ठरणार नाही का ? बेकारांसाठी हा जोडधंदा म्हणून सुद्दा उपयोगात येण्याची शक्यता नाकारता येत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)