राजमुद्रेच्या स्टिकरचा खुलेआम गैरवापर

पिंपरी – शासकीय नियमांनुसार विधानसभा सदस्यांसाठी व त्यांच्या सुविधेसाठी त्यांच्या गाडीवर राजमुद्रेचे स्टिकर चिटकवण्यास दिले जाते. मात्र भोसरी, चिखली व मोशी येथे सर्रास गाड्यांवर हे स्टिकर चिटकवण्यात आले असून त्याचा गैरवापर होण्याची शक्‍यता असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

यासंदर्भात दत्ता साने यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्‌मनाभन यांना निवेदन दिले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात केवळ तीन विधानसभा सदस्य आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक गाड्यांवर राजमुद्रेचे स्टिकर असल्याचे पहावयास मिळत आहे. विशेषतः मोशी, चिखली, भोसरी परिसरात या गाड्यांचा वावर आहे.

-Ads-

तसेच महापालिका मुख्यालयाच्या आवारात देखील ही वाहने आढळून येत आहेत. या गाड्यांच्या समोरील व मागच्या काचेवर बिनधास्तपणे हे स्टिकर लावले जात आहेत. या गाड्या विधानसभा सदस्यांच्या नसून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. या स्टिकरचा गैरफायदा घेण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे संबंधीत वाहनांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)