राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

चिंबळी- मरकळ जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक एक व दोनमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमतः शाळेच्या मुख्याध्यापिका अलका ओव्हाळ व सुनिता आहेर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक नामदेव गायकवाड वृषाली खरात, वैशाली पालांडे, स्वाती तायडे, सुवर्णा शिंदे, प्रशांत आंधळे, प्रवीण माटे, सुरेखा काळे, निलिमा पंडित, जानकी मुरकूट व विद्यार्थी यांनी राजमाता जिजाऊ व विवेकानंद यांचे जीवनविषयक माहिती सांगितली. त्यानंतर शाळेतील सर्वच मुलांनी कवायत व लेझीम प्रात्यक्षिके विनोद चव्हाण यांनी सादर करून मान्यवरांना अभिवादन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)