राजमातांमुळेच मंगळवार तळ्यातील गणेशविर्सनावर बंदी आली : अविनाश कदम

आमदार व खासदार गटात आरोप प्रत्यारोपांची कळवंड सुरूच

सातारा- मंगवार तळ्यात गणेशविसर्जन करण्यास बंदी करण्याची मागणी मी नव्हे तर, राजमाता कल्पनाराजे भोसले यांनीच केली होती. 2015 ला राजमातांनीच जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देवून मंगळवार तळ्यात गणेशमुर्ती विजसर्जीत करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी केली होती. विसर्जनाबाबतच्या सुनावणीस उच्च न्यायालयाने 10 तारीख दिली आहे पण, गणेशोत्सवास तर 13 तारखेला सुरुवात होत आहे. सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता असून विसर्जनाची सोय करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मात्र आता फार उशीर झाला आहे. त्यामुळे स्वत:च्या चुका लपवण्यासाठी दुसऱ्यावर शिंतोडे उडवून प्रश्‍न सुटणार आहे का? असा सवाल माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी केला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कदम यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला असताना गणेशमुर्ती विसर्जनासाठी स्थळ उपलब्ध झालेले नाही. यामुळे सातारकर आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. सातारा पालिकेच्या इतिहासात कधीही निर्माण झाली नाही अशी गंभीर समस्या निर्माण झाली असून याला सर्वस्वी सातारा पालिका जबाबदार आहे.

दोन दिवसांपुर्वी सत्ताधाऱ्यांनी काढलेल्या पत्रकात मंगळवार तळ्यात गणेशमुर्ती विसर्जनाला अविनाश कदम यांनी विरोध केला म्हणून या तळ्यातील विसर्जन बंद झाले, अशी धादांत खोटी आणि चुकीची माहिती देण्यात आली. वास्तविक 2015 सालीच दस्तुरखुद्द राजमातांनीच जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देवून मंगळवार तळ्यातील विसर्जनास प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने मंगवार तळ्यात विसर्जनास मज्जाव करुन हे तळे बंद केले. याचे लेखी पुरावे उपलब्ध आहेत आणि सोशल मिडीयावर सध्या राजमातांचे हे पत्र सर्वत्र फिरत आहे. त्यामुळे स्वत: चुका करायच्या आणि वादंग निर्माण झाला की त्याचे खापर दुसऱ्यावर फोडायचे हा नेहमीचाच प्रकार सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. असा आरोप कदम यांनी केला आहे.

स्वत:चा नाकर्तेपणा आणि बेजबाबदारपणा लपवण्यासाठी सत्ताधारी सातारा विकास आघाडी पत्रकबाजी करुन नेहमीप्रमाणे शिळ्या कढीला उत आणत आहे. येत्या 10 दिवसांत गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. विसर्जन कोठे करायचे यासाठी पालिका उच्च न्यायालयात गेली आहे आणि न्यायालयाने सुनावणीसाठी 10 तारीख दिली आहे. 13 तारखेला गणेशोत्सव प्रारंभ होत असल्याने अजूनही गणेशमुर्ती विसर्जनाचा प्रश्‍न अनुत्तीर्णच आहे. याचे सत्ताधाऱ्यांना काहीही देणेघेणे नाही. स्वत:ची चूक लपवण्यासाठी दुसऱ्यावर शिंतोडे उडवायचे प्रकार सुरु असून त्यातून विसर्जनाची समस्या सुटणार आहे का? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)