राजमाची येथील वन जमिनीवर 6 हजार वृक्षांचे रोपण

राजमाची : येथील वनजमिनीवर वृक्षारोपण करताना मान्यवर.

 

कराड, दि. 11 (प्रतिनिधी)- वन विभाग आणि कराड जिमखान्याच्या संयुक्‍त सहकार्याने मंगळवारी राजमाची, ता. कराड येथील वन जमिनीवर 6 हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले.
वन क्षेत्रपाल ताजणे, कराड जिमखान्याचे सुधीर एकांडे, नाना खामकर, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, डॉ. शहा, इनरव्हील क्‍लबच्या महिला पदाधिकारी, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातील एनएसएसचे छात्र, शाळांचे विद्यार्थी, राजमाचीसह परिसरातील युवकांनी वड, पिंपळ, यासारख्या झाडांचे रोपण केले. वृक्षारोपणाच्या ठिकाणी सर्वांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.
वन जमिनीवर अगोदरच खड्डे खणून त्यात खत टाकण्यात आले होते. मंगळवारी विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरणाशी बांधिलकी जपली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)