राजमाचीच्या पायथ्याशी निसर्गाचे धडे

वडगाव-मावळ – धकाधकीच्या आणि ताण-तणावाच्या जीवनामध्ये लहान मुले निसर्गाबाबत आणि इतिहासाबाबत उदासीन असतात. मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये निसर्गाशी जवळीक ही तितकीच आवश्‍यक असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मावळ तालुका बुरुड समाज संघटनेने समाजातील चाळीस लहान मुलांची मावळ तालुक्‍यातील ऐतिहासिक राजमाची किल्ल्यावर सहल नेली होती.

लोणावळ्यापासून अवघ्या बारा किलो मीटरवर आणि पुणे-रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणारा राजमाची किल्ला सह्याद्रिच्या मुख्य रांगेत आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन किल्ल्याचे वेगळेपण म्हणजे श्रीवर्धन आणि मनरंजन या नावाचे दोन बालेकिल्ले. या किल्ला परिसरातील सदाहरित जंगल, डोंगर-शिखरे यामुळे दुर्ग प्रेमींची वर्दळ असते. लहान मुलांना सह्याद्रि, वृक्ष, पशू-पक्ष्यांची माहिती देण्यात आली. गिर्यारोहक व दुर्गप्रेमी ओंकार वर्तले यांनी संपूर्ण राजमाची किल्ल्याची सफर करून तपशीलवार माहिती मुलांना सांगितली.

किल्ला कसा पहावा व त्याचे संवर्धन कसे करावे, याचीही जाणीव वर्तले यांनी लहान मुलांना करून दिली. दाट वृक्षराजींमध्ये मुलांच्या निसर्ग प्रश्न-मंजुषेचाही कार्यक्रम रंगला. सहल आटोपल्यानंतर साफ-सफाई करून पर्यावरण रक्षणाची माहितीही देण्यात आली. राजमाची दर्शन सहलीमध्ये एकूण 40 मुले व 20 महिला होत्या. मावळ तालुक्‍याचे अध्यक्ष राजू जगताप, सचिव संतोष पळसे, महेंद्र पळसे, महादेव वर्तले, संदीप आरते, ऋषिकेश नागे, सुभाष जगताप यांनी नियोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)