राजपथावरील परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम क्रमांकावर

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीत परेड झाली होती. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आसामचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समजते. यावेळी देशाची ताकद, भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचे दर्शन जगाला झाले होते.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर विविध राज्यांचे तसेच दूरदर्शन, सैन्यदलासह विविध खात्यांचे चित्ररथ साकारण्यात आले होते. महाराष्ट्राने यावर्षी शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता. तर आसामने स्थानिक लोककलांवर आधारित चित्ररथ साकारला होता. छत्तीसगडच्या चित्ररथानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथांच्या क्रमांकाची अधिकृत घोषणा झालेली नाही.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)