राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील २० एनसीसी कॅडेट्सची निवड

नवी दिल्ली: या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्यापथसंचलनासाठी महाराष्ट्रातील 20 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.

येथील छावनी परिसरातील डिजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु यांच्या हस्ते आज या शिबिराचे उद्घाटन झाले. देशभरातील 17 एनसीसी संचालनालयाचे 2000 कॅडेट्स यात सहभागी झाले आहेत. मानाच्या समजण्यात येणाऱ्या राजपथावरील पथसंचलनात देशभरातील 144 एनसीसी कॅडेटस सहभागी होणार आहेत पैकी महाराष्ट्रातील 20कॅडेट्सची निवड झाली आहे.

राज्यातील 111 एनसीसी कॅडेट्स 1 जानेवारी पासून या शिबिरात दाखल झाले आहेत. यात 74 मुले तर 37 मुली आहेत. त्यातील 16 कॅडेट्स  हे माध्यमिक शाळांचे तर उर्वरीत 95 कॅडेट्स हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. यातील 10 मुले आणि 10 मुली अशा एकूण 20 कॅडेसची प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्यापथसंचलनासाठी निवड झाली आहे. 28 जानेवारीला  होणाऱ्या ‘पंतप्रधान रॅली’मध्ये मानवंदना देण्यासाठी 50 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. राष्ट्रपती,पंतप्रधान आदी गणमान्य व्यक्तींना मानवंदना देण्यासाठी 9 कॅडेट्सची निवड झाली आहे.

घोडस्वारी  व सांस्कृतिक  कार्यक्रमांसाठीही महाराष्ट्राचे कॅडेट निवडले जाणार – कर्नल एम.पी.एस. मौर्य 

राजपथावरील एनसीसीच्या घोडस्वार पथकातील सहभागासाठी आणि एनसीसी कॅडेटसची गणमान्य व्यक्तींच्या  भेटी दरम्यान एनसीसीच्यावतीने सादर होणाऱ्यासांस्कृतिक कार्यक्रमासाठी कॅडेट्सची निवड प्रक्रिया सुरु असून त्यातही महाराष्ट्राच्या कॅडेटसची मोठ्या संख्येने निवड होईल, असा विश्वास महाराष्ट्राच्या एनसीसी संघाचे प्रमुख कर्नल एम.पी.एस. मौर्या यांनी  महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना व्यक्त केला.

महाराष्ट्राला पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळणार : कर्नल मौर्य

वर्षभरातील कामगिरी व राजपथ पथसंचलनासाठीचे शिबिर या दरम्यान विविध स्पर्धांच्या आधारावर  सर्वोत्तम एनसीसी संचालनालयासाठी दिला जाणारा ‘पंतप्रधान बॅनर’ हा बहुमानाचा निकाल 27 जानेवारी रोजी घोषीत होणार आहे. गेल्या 27 वर्षांपैकी 17 वेळा ‘पंतप्रधान बॅनरचा’ बहुमान मिळवणारा महाराष्ट्र यावर्षीही हा बहुमान मिळवणार तसेच बेस्ट कॅडेट्सचा पुरस्कारही राज्याच्याच वाट्याला येणार असा विश्वास  कर्नल एम.पी.एस. मौर्या यांनी  व्यक्त केला.

या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत येथे पार पडलेल्या ड्रिल स्पर्धा, राष्ट्रीय एकात्मता जागरुकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, पंतप्रधान रॅली मानवंदना निवड स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील कॅडेट्स सहभागी झाले असून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)