राजपत्रित अधिकाऱ्यांचा संप

मागण्यांबाबत शासनाची चालढकल होत असल्याचा आरोप ;
पुण्यातील दहा हजार अधिकाऱ्यांचा समावेश

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 3 – राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाच्या होत असलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ राज्यासह पुण्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पत्रकाद्वारे दिली. या संपामध्ये पुण्यातील दहा हजार अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजपत्रीत अधिकाऱ्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत अनेकवेळा बैठका पार पडल्या. त्यामध्ये सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता वेळेवर मिळत नाही, पाच दिवसांच्या आठवडा अशा विविध मागण्या वारंवार करूनही त्याबाबत ठोस निर्णय किंवा अंमलबजावणी होत नाही. प्रत्येकवेळी केवळ आश्‍वासने दिली जातात. त्यामुळे दि. 7, 8 आणि 9 ऑगस्टला राज्यासह पुणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी संपावर जाणार असल्याची माहिती महासंघाचे पुणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष एन. पी. मित्रगोत्री यांनी दिली.

दररोज 45 मिनिटे काम अधिक करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा. केंद्रात व 23 राज्यात सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे असताना तसेच राज्यात काही संवर्गात 62-65 वय असताना, राज्य शासकीय सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षच ठेवण्यात आले आहे. रिक्तपदे जवळपास दोन लाखांपर्यंत आहेत. यासंदर्भात कार्यकारणीची गुरूवारी बैठक झाली. यामध्ये शासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून तीन दिवस संप करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. 72 राजपत्रित अधिकारी संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)