राजनैतिक अधिकाऱ्यांची कथित छळवणूक

चर्चेतून तोडगा काढण्यावर भारत-पाकिस्तानमध्ये सहमती
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानमध्ये एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कथित छळवणुकीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आता या मुद्‌द्‌यावर चर्चेतून तोडगा काढण्याबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यांनी स्वतंत्र निवेदन जारी करून याबाबतची माहिती दिली.

दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे कार्य सुरळितपणे आणि विनाअडथळा चालावे यासाठी 1992 मध्ये आचारसंहिता निश्‍चित करण्यात आली. त्याआधारे राजनैतिक अधिकाऱ्यांना वागणूक देण्यासाठी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाच्या तक्रारी दूर करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला.

भारतात 7 मार्चपासूून पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांना त्रास देण्याच्या 26 घटना घडल्याचा आरोप त्या देशाने केला होता. एवढेच नव्हे तर, संबंधित मुद्‌द्‌यावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने भारतातील आपले उच्चायुक्त सोहेल महमूद यांना मायदेशी बोलावले होते.

त्यानंतर भारतानेही आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानात त्रास दिला जात असल्याचे निदर्शनास आणून देत विशिष्ट घटनांचा उल्लेख केला होता. आता संबंधित मुद्‌द्‌यावर चर्चेतून तोडगा काढण्याविषयी दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. मात्र, ही सहमती कुठे आणि कशी झाली ते स्पष्ट करण्यात आले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)