राजनाथ सिंह यांनीही केली राहुल यांच्या माफीची मागणी

नवी दिल्ली: राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला क्‍लीन चीट दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही राहुल गांधी यांच्या माफीची मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणात लोकांची सातत्याने दिशाभुल केली आहे पण त्यांनी आता लोकांची माफी मागितली पाहिजे असे ते म्हणाले. ते म्हणाले की गेले काही दिवस कॉंग्रेसने राफेल प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. हा आरोप चुकीच्या माहितीवर आधारीत होता. यातील नेमके सत्य न्यायालयाच्या निकालाने बाहेर आले आहे. कॉंग्रेसने आपल्या आरोपांविषयी आता आत्मपरिक्षण केले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. सरकारने या व्यवहाराविषयी आपली भूमिका पहिल्यापासूनच लोकांपुढे ठेवली आहे असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)