राजधानी दिल्लीतून लंडनला हलवा नाहीतर दिल्लीत परदेशी सेट उभारा

मुंबई : देशात अनेक मोठय़ा राज्यांतील ‘एटीएम’चे रिकामे डबे झाले आहेत, अर्थव्यवस्था कोसळत आहे व मोदी हे परदेशात जाऊन भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. आता मनमोहन सिंग बोलू लागले व मोदी गप्प झाले. हा काळाने भाजपवर घेतलेला सूडच म्हणावा लागेल. ‘‘मला संसदेत फक्त पंधरा मिनिटे बोलू द्या, मोदींचा आवाज कायमचा बंद करून दाखवतो’’ अशी भाषा राहुल गांधी करू लागलेत. मोदी यांचा मनमोहन झाल्याचे हे प्रमाण आहे. एकतर राजधानी दिल्लीतून लंडनला हलवा नाहीतर दिल्लीत परदेशी देखाव्यांचा सेट उभारा. मोदींना बोलते करावेच लागेल, असा टोला शिवसेनेने भाजप सरकारला ‘सामना’तील अग्रलेखातून लगावला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

-Ads-

मोदी हिंदुस्थानात ‘मौनी बाबा’ असतात, पण परदेशी भूमीवर ते बोलके होतात. स्वदेशात त्यांना बोलूच नये असे वाटते. येथे घडणाऱ्या घटनांचा त्यांना उबग येतो. मग ते परदेशात जातात व स्वदेशातील घटनांवर बोलतात. सध्या मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. ते आधी स्वीडन दौऱ्यावर होते. तिथेही स्वदेशातील घटना व घडामोडींवर बोलले. आता ते लंडनला पोहोचले व तेथूनही त्यांनी स्वदेशवासीयांना संदेश दिला आहे. म्हणजे आमच्या पंतप्रधानांना देशातील बऱ्यावाईट घटनांविषयी ‘व्यक्त’ होताना पाहायचे असेल तर हिंदुस्थानची राजधानी लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, पॅरिस, जर्मनी येथे हलवावी लागेल. ते शक्य नसेल तर दिल्लीचे रूपांतर हे सिनेमातील भव्य सेटप्रमाणे परदेशातील शहरात करावे लागेल. त्यासाठी भाजपवाल्यांना कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची मदत घेता येईल.

मुलींवरील बलात्कार हा चिंतेचा विषय असून ती देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. बलात्कारासारख्या घटनांवर देशाच्या पंतप्रधानांनी परदेशी भूमीवर बोलणे कितपत योग्य आहे? घरातली अब्रू घरातच ठेवायला हवी. स्वदेशातील बेइज्जतीच्या प्रकरणांची झाकली मूठ परकीय भूमीवर का उघडायची? हिंदुस्थानात भ्रष्टाचार, बलात्काराची प्रकरणे वाढत आहेत व देश असुरक्षित बनल्याचे चित्र परकीय भूमीवर का रंगवावे? मागे जपानला जाऊन पंतप्रधान स्वदेशातील काळा पैसा व भ्रष्टाचारावर बोलले. आधीच्या राज्यकर्त्यांशी तुमचे वैर असू शकते, काँग्रेस किंवा गांधी परिवार भाजपचे हाडवैरी असू शकतात. म्हणून परदेशी भूमीवर जाऊन देशातील घटनांवर बोलणे कुणालाही शोभत नाही.

 

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)