राजधानी एक्‍सप्रेसः आता मुंबई-दिल्ली अंतर 5 तासांनी होणार कमी

नवी दिल्ली – पुढील महिन्यात भारतीय रेल्वेचा वेग वाढणार असून मुंबई ते दिल्ली हे अंतर 17 तासांवरुन 12 तासांवर येणार आहे. राजधानी एक्‍स्प्रेसचा वेग 30 टक्‍क्‍यांनी वाढणार असल्याने मुंबई-दिल्ली दरम्यान प्रवास करताना प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. मुंबई-दिल्ली प्रवासासोबतच दिल्ली-हावडा प्रवासासाठी लागणारा वेळदेखील 17 तासांवरुन 12 तासांवर येणार आहे.

मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा या दोन्ही मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढवून ताशी 200 किलोमीटर इतका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे हे दोन्ही रेल्वे मार्ग देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे मार्ग होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)