राजधानीत शहिदांना अभिवादन

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढयात महत्त्वाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त राजधानीत अभिवादन करण्यात आले.

कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव तथा  गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र  यांनी शहिदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त  सुमन चंद्रा यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)