राजधानीत दांडिया महोत्सवाची बहार

जिजाऊ प्रतिष्ठान,शिवछत्रपती ट्रस्ट,दै. प्रभातचा संयुक्त उपक्रम
सातारा – डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या पावलांनी ताल धरला आणि राजधानी रास दांडियाने अनंत इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात बहार आणली. जिजाऊ प्रतिष्ठान व शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट व दै. प्रभात यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित राजधानी रास दांडियाने पहिल्या दिवशीच वातावरणात रंग भरला. वेगवेगळ्या अप्रतिम गाण्यांचा साज व पारंपारिक वेषातील गृहिणींनी टिपऱ्यांचा फेर धरत धमाल उडवून दिली.

सायंकाळी साडेसातच्या दरम्यान प्रांत स्वाती देशमुख व महिला व बाल कल्याण अधिकारी रोहिणी ढवळे यांच्या हस्ते दांडिया महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. बहारदार सादरीकरण आणि सोबतीला विविध रंगांच्या आकर्षक रोषणाईमुळे आठव्या दिवशीही दांडियापटूंची रेकॉर्डब्रेक गर्दी दिसून आली. आपल्या देशाबदद्‌ल आदर, प्रेम आणि स्फुर्ती निर्माण करणारे प्रेरणा खदायी गीत अब अराण गगण पर महाप्रगती का, फिर मंगल गान उठा. करवट बदली अंगडाई ली, सोया हिंदुस्तान उठा. या गीताने मानवंदना देण्यात येते.

-Ads-

अशा देशभक्ती गीतांमुळे हा रास दांडिया तरुणाईत देशभक्तीची प्रेरणा निर्माण करणारा ठरत आहे. देशभक्ती, कृष्णालीला आणि काही पारंपारिक आणि उडत्या ठेक्‍यांच्या गाण्यांनी वातावरणाचा नूरचं बदलून टाकला. दांडिया फक्त महिलांसाठी म्हणल्यावर नारी शक्‍तीच्या पारंपारिक नृत्यांचा मुक्‍त अविष्कार या निमित्ताने पहायला मिळाला. स्वाती देशमुख व रोहिणी ढवळे या महिला अधिकाऱ्यांनी सुद्धा सरकारी बाज बाजूला ठेवून दांडियाचा आनंद मिळवला. हा जल्लोष सोहळा तब्बल तीन तास सुरु होता.

रंगत जाणारे गीत संगीत आणि त्याच्या तालावर बेधुंदपणे दांडिया खेळण्याचा उत्साह तरूणाईला आकर्षित करत आहे. दांडियापटूंचा बेधुंद जल्लोष आणि धमाल यानिमित्ताने सातारकरांना अनुभवायला मिळत आहे. दांडियात लयबध्द गाणी नाचण्याच्या लयबद्ध पध्दती सोबत टिपऱ्यांची खनक युवती वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे आदिशकतींचा जल्लोष रात्री साडेआठनंतर टिपेला पोहचला. दांडियापटूंनी पाहणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधले.

यावेळी विविध वेशभुषा तसेच लक्षवेधक दांडिया खेळून प्रत्येकाला आलाप गीत संगीत समुहाच्या प्रसिध्द गायिका सरला अभिजीत शिंदे, यांच्या गीत संगीतावर तरूणाईला थिरकायला लावत आहे. ऐंशी नव्वदच्या दशकातील गाण्यांनंतर अलीकडच्या नव्या सुरावटीच्या गाण्यांवर दांडिया गीते सादर करण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)