राजदंड पळविणे हा शिवसेनेचा “स्टंट’! – विखे-पाटील

File Photo

मुंबई – नाणार प्रकल्पावरून राजदंड पळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न म्हणजे निव्वळ “स्टंट’ होता. या प्रकल्पाला तोंडदेखला विरोध करून शिवसेना कोकणातील जनतेचा विश्वासघात करते आहे. शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे.

मंगळवारी विधान परिषदेत नाणारचा मुद्दा उपस्थित झाला असता शिवसेना मूग गिळून बसली होती. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे सांगून त्यांचे उद्योगमंत्रीही गप्प बसलेले होते. या दुटप्पी भूमिकेसाठी वर्तमानपत्रांनी झोडून काढल्यानंतर शिवसेनेला दुसऱ्या दिवशी खडबडून जाग आली आणि म्हणून “डॅमेज कंट्रोल’साठी त्यांना राजदंड पळविण्याची नौटंकी करावी लागली. रस्त्यावर एक अन्‌ विधीमंडळात वेगळीच भूमिका मांडून शिवसेना कोकणवासियांची शुद्ध फसवणूक करीत असल्याचा घणाघात त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)