राजगुरूनगर बॅंकेच्या आळंदी शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

आळंदी- पुणे जिल्ह्यातील सहकार व इतर क्षेत्रात अग्रेसर असलेली राजगुरुनगर सहकारी बॅंक शाखा श्रीक्षेत्र आळंदी देवाची (मरकळ रोड) येथील शाखा स्थापनेस आज (सोमवारी) पाच वर्षे पूर्ण झाल्याने, शाखेचा वर्धापनदिन हा सत्यनारायण महापूजा व सर्व खातेदारांना अल्पोपहार देऊन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी शाखेच्या इमारतीस विविध रंगी फुलांच्या माळा, फुगे व प्रत्येक द्वारावर आकर्षक अशी रांगोळी काढून परिसर सजविण्यात आला होता. यावेळी शाखा व्यवस्थापक रमेश शिंदे यांना राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रताप आहेर, चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रवींद्र थोरवे, सचिन घोलप, काळुराम थोरवे, बाप्पुसाहेब सस्ते, कृष्णाजी थोरवे, महादेव पाखरे, पंकज पाखरे, सरपंच अश्‍विनी सस्ते, रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्षा नियती शिंदे, वैशाली बेहरा, अलका काळे, रुपाली आवटे, जयश्री कदम आदींसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, खातेदारांनी शाखा व्यवस्थापक रमेश शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)