राजगुरूनगर बसस्थानकातून सोन्यची चेन लंपास

दावडी- राजगुरूनगर येथे बसस्थानकात एसटीमध्ये चढत असताना गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी लांबविल्यांची घटना घडली आहे. याबाबत चंद्रशेखर सदाशिव शेटे (वय 56, रा. मुळगाव पाईट, ता. खेड, सध्या रा. कळवा, मुंबई)यांनी फिर्याद दाखल केली आहे. शेटे हे सकाळी ठाणे येथुन एसटीने राजगुरुनगर येथे आले होते. त्यानंतर ते पाईट येथे जाण्यासाठी भलवडी या एसटीमध्ये चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील 1 तोळ्यांची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी लांबवली याबाबत शेटे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)