राजगुरूनगर बसस्थानकाचे नुतनीकरण संथ गतीने

राजगुरूनगर-उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारे पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर एसटी बसस्थानक. हे एक महत्वाचे आगारही आहे. या बसस्थानकातून खेड तालुक्‍यातील 165 गावांबरोबरच पुणे, मुंबई, नाशिक या मोठ्या शहरांत जाणाऱ्या बसेसची व प्रवाशांची संख्या मोठी आहे. राज्यात जास्त उत्पन्न देणारे म्हणून राजगुरूनगर एसटी बस आगाराचा उल्लेख आहे. मात्र याच बसस्थानकाचे नुतनीकरणाचे काम गेल्या सात महिन्यांपासून अगदी संथ गतीने सुरु आहे. या नुतनीकरणाच्या काम हळूहळू होत असल्याने त्याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या बसस्थानकात अनेक गावांतून महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक महिला एसटीने प्रवास करतात. त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी ते बसस्थानकात एसटीची वाट पाहत बसलेले असतात. त्यात हे काम सुरू असल्याने अनेक मोठे कर्कश आवाज होत धुळीचा त्रास होत आहे. गेली सात महिन्यांपासून हे काम सुरू असल्याने प्रवासी याचा त्रास सहन करीत आहेत. बसस्थानकाच्या नुतणीकरणासाठी 80 लाख रुपयांचा निधी आमदार सुरेश गोरे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. तर बसस्थानकाच्या समोरील बाजुस देशासाठी बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांच्या पूर्णाकृती पुतळे व गार्डन सुशोभिकरणासाठी खासदार शिवाजी आढळराव यांच्या माध्यमातून 50 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हुतात्मा राजगुरुंचा पुतळा पुणे-नाशिक महामार्गालगत असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी राजगुरुप्रेमींना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पहायला मिळत असते. राजगुरुनगर बसस्थानक हे संपूर्ण तालुक्‍याचे केंद्रस्थान व हुतात्मा राजगुरुंची जन्मभूमी असल्याने हुतात्मा राजगुरुंच्या पुतळ्याचे काम अत्यंत चांगल्या दर्जाचे करण्यात येणार आहे.

  • आमदार-खासदारांकडून पाहणी
    या कामाची आज (दि. 24) खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. हे काम जलद गतीने करण्याचे आदेश खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दिले. यावेळी शाखा अभियंता भास्कर क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, उपतालुका प्रमुख शिवाजी वर्पे, महिला जिल्हाप्रमुख विजया शिंदे, जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, शहर प्रमुख उर्मिला सांडभोर, दिलीप तापकीर, गोरक्ष सुकाळे, कैलास गोपाळे आदी उपस्थित होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)