राजगुरूनगर परिषदेत आधार केंद्र सुरू

राजगुरूनगर – राजगुरूनगर नगरपरिषदेमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार आधार नोंदणी कक्ष सुरू करण्यात आला, असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.
राजगुरूनगर शहरात आणि शहराबाहेरील गावांमधील नागरिकांना आधार नोंदणी करण्यासाठी आधार नोंदणी केंद्र राजगुरूनगर नगरपरिषदेत सुरू करण्यात आले आहे. राजगुरूनगर शहरातील नागरिकांची गैरसोय आणि आधार नोंदणीसाठी घेण्यात येणारी अवास्तव फी यावर मार्ग काढण्यासाठी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे नगरपरिषदेत आधार नोंदणी कक्ष सुरू करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यास मान्यता दिली असून आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे
राजगुरूनगर नगरपरिषदेत आधार केंद्र सुरू झाल्यानंतर नागरिकांनी आधार कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. नवीन आधार कार्ड काढण्यावरोबर आधारकार्डमधील चुका दुरुस्त केल्या जात असल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या हस्ते आधार नोंदणी केंद्राची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक सचिन मधवे, राहुल आढारी, मनोहर सांडभोर,शिवाजीराव डावरे, सुभाष जैद, भाऊसाहेब वायदंडे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)