राजगुरूनगर चकाचक

राजगुरूनगर- स्वच्छता पंधरवड्यानिमित्त हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सुमारे 350 स्वयंसेवकांनी राजगुरुनगरमधील पोलीस ठाणे, बसस्थानक, राजगुरूवाडा, नगरपरिषद, पंचायतसमिती, प्रांतकार्यालय, तहसीलदार कचेरी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच राजगुरू पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली.
खेड तालुक्‍यात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया व तापाच्या साथीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन समाज प्रबोधनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राजगुरु नगरपरिषद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने डेंग्यू, मलेरिया विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रासेयो स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर केले. नगरपरिषदेच्या स्वाती पाटील यांनी ओला कचरा व सुका कचरा यांच्या वर्गीकरणाबाबत माहिती दिली. आरोग्याधिकारी डॉ. उदय पवार यांनी साथीच्या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावोगावी जाऊन लोकांचे प्रबोधन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी गणेश देव्हरकर, आरोग्य सहायक निलेश सोनवणे, सतीश मोरे, आरोग्य परिचर संपत गारगोटे उपस्थित होते. स्वच्छता ठेवी दारी डेंग्यू मलेरिया पळ काढी, क्‍लोरिक्वीनची गोळी करी हिवतापाची राखरांगोळी, येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची, कोरडा दिवस पाळा रोगराई टाळा अशा घोषणा रासेयो स्वयंसेवकांनी दिल्या.
या स्वच्छता अभियान व रॅलीचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मच्छिंद्र मुळूक, प्रा. योगेश वाळुंज, प्रा. नीता डोंगरे, प्रा.गणेश धुमाळ, प्रा. संदीप थोरात, डॉ. प्रभाकर जगताप, डॉ. कीर्ती नितनवरे, प्रा. निलेश बारणे, प्रा.संतोष कारले, प्रा.अभिजीत बेंडाले, प्रा.सचिन गायकवाड व समितीतील सर्व सदस्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)