राजगुरूनगरात 15 मे पासून ऑनलाईन बांधकाम परवाने

मुख्याधिकारी घोलप


बांधकाम व्यावसायिक, लाभार्थी, बॅंकांच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा

राजगुरूनगर – शहरात ऑनलाईन बांधकाम परवाने 15 मे पासून सुरू होणार असून राजगुरुनगर नगरपरिषदेकडे प्रलंबित असलेले बांधकाम परवान्याबाबत माहिती घेवून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.

राजगुरुनगर शहरात राजगुरुनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायिकांच्या सहकाऱ्याने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप व ऍफोर्डेबल हाउसिंग पार्टनरशिप ही योजना राबविण्यात येणार आहे. तर शहरातील स्वतःच्या मालकीचे जागेत लाभार्थीला पक्के घर बांधण्यासाठी अगर त्याची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राजगुरुनगर शहरातील बांधकाम व्यावसायिक व लाभार्थी व शहरातील राष्ट्रीयकृत बॅंकाचे अधिकाऱ्यांची एकत्रित कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी घोलप यांनी ही माहिती दिली.

या कार्यशाळेला नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, स्टेट बॅंकेचे व्यवस्थापक श्रीधर अय्यर, ऍक्‍सिस बॅंकेचे भावेश परदेशी, केपीएमजी कन्सल्टिंगचे कुशल दलाल, नियोजन समितीच्या सभापती रेखा क्षोत्रीय, माजी उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर, नगरसेवक राहुल आढारी, सचिन माधवे, सुरेश कौदरे स्नेहल राक्षे, शंकर राक्षे, बांधकाम व्यावसयिक सुर्धीर मांदळे, जयंत घोरपडे, मकरंद गाडगीळ, प्रदीप भूमकर, पांडुरंग होले, निलेश घुमटकर, राहुल पिंगळे यांच्यासह लाभार्थी, बॅंकाचे प्रतिनिधी, बांधकाम व्यावसयिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत बांधकाम व्यवसायिक सुधीर मांदळे, जयंत घोरपडे, राहुल पिंगळे, सोपान घुमटकर यांनी विविध मुद्दे मांडले. त्यांचे बॅंकेचे अधिकारी, केपीएमजी कन्सल्टिंगच्या अधिका-यांनी शंका निरसन केले. प्रास्ताविक नगरसेविका सारिका घुमटकर यांनी केले. आभार नगरसेवक शंकर राक्षे यांनी मानले.

राजगुरूनगरात केंद्र सरकारच्या लाभार्थी नेतृत्व बांधकाम (नवीन व विस्तारीकरण) पंतप्रधान आवास योजना (नागरी) प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी शहरातील काही शासकीय जागांची पाहणी करून माहिती घेवून त्या ठिकाणी बांधकाम व्यावसयिक आणि नगरपरिषद यांच्या माध्यमातून भविष्यात बांधकाम करून नागरिकांना परवडेल अशा किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. शहरातील नागरिकाच्या मालकीच्या जागा आहेत त्यांना त्यांच्या ठिकाणी या योजनेतून घरे बांधता येतील अगर त्याची दुरुस्ती करता येणार आहे यासाठी शासनाकडून 2 लाख 67 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
-शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरूनगर नगरपरिषद


स्टेट बॅंकेच्या माध्यमातून नागरिकांचे घराचे स्वप्न साकार केले जात आहे. बॅंकेच्या माध्यमातून चार गटात घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जात आहे त्यात शासनाच्या पंतप्रधान आवास योजेनेतून लाभार्थ्याला 2 लाख 67 हजार अनुदान देण्यात येते. याचा लाभ घ्यावा.
– श्रीधर अय्यर, व्यवस्थापक, स्टेट बॅंक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)