राजगुरूनगरात सहाय्य पोलीस निरीक्षकपदी येळे

राजगुरूनगर – राजगुरूनगर पोलीस ठाण्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक म्हणून नुकतीच संदिप जनार्दन येळे यांची नेमणूक झाली आहे. राजगुरूनगर पोलीस ठाण्यात गेली अनेक दिवसांपासून सहायक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस उपनिरीक्षकपदे रिक्‍त होती. यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे यांनी नुकताच चार्ज घेतला आहे. संदीप येळे यांनी या अगोदर सोलापूर ग्रामीण, नागपूर शहर, मुंबई शहर येथे काम केले आहे. तालुक्‍यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे येळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)