राजगुरूनगरात रस्ता कॉंक्रिटीकरणाचे भूमिपूजन

पालकमंत्री बापट यांच्या हस्ते विकासकामांचे उद्‌घाटन
राजगुरुनगर- राजगुरुनगर येथील सुप्रसिद्ध देवस्थान श्री सिद्धेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण व पाबळ रोड ते पीडीसीसी लाइन रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आज (शनिवारी) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

खेड तालुक्‍यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटने आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार बाळा भेगडे, तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, सिद्धेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ सांडभोर, भाजपचे राजन परदेशी, पांडुरंग ठाकूर, रामदास धनवटे, जयसिंग एरंडे, विष्णू बोऱ्हाडे, कालीदास वाडेकर, रामदास मेदनकर, माऊली वाफगावकर, प्रदेश सदस्या संगीता जगताप, पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा क्रांती सोमवंशी, तालुका अध्यक्षा रुपाली परदेशी, जिल्हा सचिव मोहिनी राक्षे, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, नगरसेवक संपदा सांडभोर, रेखा क्षोत्रीय, मनोहर सांडभोर राहुल आढारी, नंदा जाधव, स्नेहल राक्षे, स्नेहलता गुंडाळ, अर्चना घुमटकर, सचिन मधवे, शंकर राक्षे, रफिक मोमीन, राजू जाधव, निलेश घुमटकर यांच्यासह मोठ्या संख्येने सहरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नियोजित तालुक्‍यातील विविध विकासकामांची भूमिपूजन, उद्‌घाटने भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार संजय भेगडे, तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे यांच्या हस्ते करण्यात आली.

राजगुरुनगर : येथे नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या श्री सिद्धेश्‍वर देवस्थान परिसर सुशोभीकरण व पाबळ रस्ता ते पीडीसीसी लाइन रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित इतर मान्यवर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)