राजगुरूनगरात रंगला आयकर कायदा मेळावा

राजगुरूनगर- रोटरी क्‍लब ऑफ राजगुरूनगर, आयकर विभाग आकुर्डी व व्यापारी महासंघ राजगुरूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयकर कायदा शंका समाधान व व्यापारी मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. याप्रसंगी आयकर विभागाच्या उपायुक्‍ता दीपा हिरे, अधिकारी शुभदा पाटील, प्रदिप कुंभार, पंकज कुमार व सनदी लेखापाल (सीए) दिलीप कटारे, सुशील शिंगावी, रुपेश अरगडे, संतोष बोथरा, प्रदिप कासवा, अनुराग आरुडे, गणेश घुमटकर, विनय लोढा, विकास सुभेदार, सतीश वेहळे, चेतन शेटे, सर्व रोटरी मेंबर व सर्व कर सल्लागार व बहुसंख्य व्यापारी वर्ग उपस्थित होता. दीपा हिरे यांनी आयकर विवरण पत्र, रोख व्यवहाराचे तोटे व त्यावर येणार टॅक्‍स याविषयी सखोल मार्गदर्शन केले. आयकर कायदा व्यस्थित समजून घेऊन प्रत्येकाने कर भरला तर देशाच्या विकासासाठी हात भार लागेल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सनदी लेखापाल डॉ. अशोककुमार पगरिया यांनी शेती उत्त्पन्न व त्यावरील टॅक्‍स विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हौशीराम कोहीनकर यांनी केले व रोटरी क्‍लबचे अधक्ष्य प्रवीण वाईकर यांनी आभार मानले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)