राजगुरूनगरात बैलगाड्याच्या बैलाची मिरवणूक

राजगुरूनगर- येथील श्री भोपळबुवा महाराजांची व श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेनिमित्ताने आज (रविवारी) शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर बैलगाड्याच्या बैलांची काढलेली मिरणूक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
खेड तालुक्‍यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. येथील श्री भोपळबुवा महाराजांची व श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. आज सकाळी श्री भोपळबुवा महाराजांची व श्री सिद्धेश्‍व महाराजांच्या मंदिरात नागरिकांच्यावतीने अभिषेक करण्यात आले. त्यानंतर मांडवडहाळे, हारतुरे यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. राजगुरुनगर येथील सातकर थिगळे कुटुंबीयांच्यावतीने बैलगाड्याच्या बैलांची सातकरस्थळपासून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. हे या यात्रेचे मोठे आकर्षण ठरले. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातल्याने गावागावातील यात्रांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. जरी बंदी असली, तरी बैलगाडा मालकांनी गाड्याच्या बैलांचा अजूनही सांभाळ केला आहे, करीत आहेत. या बैलगाडा शर्यतीला धावणारे बैल यात्रा उत्साहात मंदिरापर्यंत त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जात आहे. आज राजगुरुनगर येथील श्री भोपळबुवा महाराजांची व श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेनिमिताने राजगुरुनगर शहरातून थिगळे, सातकर परिवारातील बैलगाडा शर्यतीच्या बैलांची मोठी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत नागरिक सहभागी झाले होते.
येथील सहकारी सोसायटीचे सचिव खंडू थिगळे, दतोबा सातकर, दीपक थिगळे, धर्मा सातकर, पिंटूशेट राक्षे, कालिदास सातकर, अशोक सातकर, मोहन आरबुज, विशाल थिगळे, आशिष थिगळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. राजगुरुनगर येथील यात्रेच्या निमित्ताने सोमवारी (दि. 17) कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आखाड्यात निकाली कुस्त्या ठेवण्यात आल्या असून देशभरातील विविध भागातील मल्ल या आखाड्यात सहभागी होणार आहेत. या कुस्त्या येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती मैदानात होणार आहेत. वैयक्तिक निकाली कुस्त्यांसाठी पाच हजार ते एक लाखापर्यंत इनाम ठेवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)