राजगुरूनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जगुरूनगर – राजगुरूनगर येथे 15 वर्षीय शाळकरी मुलीवर एका युवकाने अत्याचार करून याबाबत कोठे वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडित मुलीने तक्रार दिली आहे.
अमित प्रकाश विटकर (रा. राजगुरुनगर, ता. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि 8 फेब्रुवारी 2018 रोजी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी कपडे धुण्यास गेली असता अमित विटक हा तिच्याजवळ आला व पीडितेचे तोंड दाबुन धरून ओरडलीस, तर तुला जिवे मारून टाकीन असा दम देत तिच्यावर अत्याचर केला. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी त्याने तिच्यावर अत्याचर केले. तु जर कोणाला काही सांगितले तर तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली आहे. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर नातेवाईकांच्या बरोबर पीडितेने खेड पोलीस ठाण्यात आज (बुधवारी) फिर्याद दिली आहे. या फिर्यादिवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदिप जाधव करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)